मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्णाण झालं आहे.
गेल्या दोन वर्षापासून आपण या महामारीशी दोन हात करत असून आता कुठे कोरोनाची लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
कोरोनाची लाट आटोक्यात येत असतानाच आता नव्या व्हेरिंयंटनं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या नव्या XE व्हेरियंटचा (XE Varient) रूग्ण आढळल्याचं समोर आल्याने देशभर खळबळ उडाली.
मुंबईत सापडलेल्या कोरोनाचे स्वरूप XE व्हेरियंटसारखे नसल्याचा दावा इन्साकॉगकडून करण्यात आला आहे. मुंबईत आढळलेल्या रूग्णाच्या जिनोम चाचणीचा अहवाल XE व्हेरियंटच्या जिनोमनुसार नसल्याचं इन्साकॉगचं मत आहे.
XE व्हेरियंटबद्दल अनेक तर्क लढवले जात असताना या व्हेरियंटचा प्रसार हा ओमिक्रॉनच्या (Omicron) BA.1 आणि BA.2 व्हेरिएंटपेक्षा 10 ते 15 टक्के अधिक पसरण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या विषाणूची संसर्गक्षमता अधिक असली तरी त्याची लक्षणं तीव्र स्वरूपाची नसल्याचं समोर आलं आहे. करोना संसर्गाचा फैलाव करणाऱ्या ‘एक्स-ई’ प्रकारच्या विषाणूच्या नव्या स्वरूपामुळे धास्तावून जाण्याची गरज नाही, असं तज्ज्ञांनी सांगतिलं आहे.
XE व्हेरिएंट हा ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या उपप्रकारांचे उत्परिवर्तन होऊन तयार झाला आहे. ओमिक्रॉनच्या या उपप्रकारात BA.1 आणि BA.2च्या जनुकीय घटकांचे मिश्रण झाल्याचे आढळले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Health | उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यानंतर ‘या’ गोष्टींचं सेवन टाळा
“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”
“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”
ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…