“फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा”

अहमदनगर | एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खानप्रकरणी अनेक आरोप होत आहेत. वानखेडेंवर रोज नवीन आरोप करणारे महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

अशातच राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर ट्विटरवर वानखेडेंवर आरोपांची झोडच लावलीय. यातच नवाब मलिक नवनवीन ट्विट करत खळबळजनक खुलासा करत आहे. यासोबतच त्यांनी भाजवरही निशाणा लगावला आहे.

रोज उठून नवाब मलिक नवनवीन गौप्यस्फोट करत आहे. रोज आरोपांचं सत्र लावलं आहे. त्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका रोजच पहायला मिळत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे.

भाजपवर निशाणा साधत मलिकांनी फडणवासांनाही लक्ष केलं. त्यामुळे आता मलिक-फडणवीस हा नवा वाद पेटलेला पहायला मिळत आहेत. पत्रकार परिषद घेत ते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. अशातच आता या वादात भाजप खासदार सुजय विखे यांनी उडी घेतली आहे.

पाथर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुजय विखेंनी अप्रत्यक्षपणे मलिकांना लक्ष केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही ताशेरे ओढले आहेत. पाथर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विखेंनी शेतकरी अनुदानाविषयी बोलताना नवाब मलिकांवर आणि आघाडी सरकारवर टीका केली.

फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा, अशी टीका विखे यांनी मलिक यांचं नाव न घेता केली आहे. याचबरोबर त्यांनी स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री उठसूट टीव्हीवर येत असल्याचही म्हटलं आहे.

पुढे रोज टीव्हीवर येणाऱ्या मंत्र्यांना शेतीत काय पिकतं हेही माहित नसतं. त्यांना पिकांचे भावही माहित नसतात. मात्र सध्या बाजारात गांजा काय भावानं मिळतो हे बरोबर माहित असतं, असं म्हणत सुजय विखेंनी मलिकांवर खोचक टीका केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक सुजय विखेंनी केलेल्या खोचक टीकेवर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “पिकांचे भाव माहित नसतात मात्र गांजाचे भाव बरोबर माहित असतात”

  “राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार” 

हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद