मुंबई | अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोनाबाबत अतिशय अजब आणि चिंता वाढवणारा दावा केला आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, पॉडकास्टवर आपली व्यथा सांगताना या व्यक्तीने दावा केला की कोरोनाबाधित झाल्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट लहान झाला आहे.
माझं वय 30 वर्ष आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात मला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर जेव्हा मी रुग्णालयातून घरी आलो, तेव्हा मी पाहिलं की माझा प्रायव्हेट पार्ट आधीच्या तुलनेत लहान झाला आहे, असं त्याने सांगितलंय.
कोरोनातून बरं झाल्यानंतर मला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं होतं. जे काही औषधांवर बरं झालं, मात्र नवीन समस्या निर्माण करून गेलं, असं त्याने म्हटलंय.
कोरोनाची लागण होण्याआधी माझ्या प्रायव्हेट पार्टची साईज नॉर्मल होती. मात्र आता आधीच्या तुलनेत ती कमी झाली आहे. कदाचित हे Vascular Damage मुळे झालं आहे आणि माझ्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ही समस्या आता कायम राहील, असंही त्या व्यक्तीने सांगितलं आहे.
पॉडकास्टमध्ये बोलताना यूएस यूरोलॉजिस्ट एशले विंटर एमडी म्हणाले, की हे खरं आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शमुळे प्रायव्हेट पार्टचा आकार लहान होतो, असंही त्याने सांगितलं.
इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये तुम्ही अशा समस्येचा सामना करता, ज्यात प्रायव्हेट पार्ट स्वतःला स्ट्रेच करत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मनात अशा काही भावना आल्यास त्याचा मेंदू प्रायव्हेट पार्टच्या नसांना तिथे रक्ताचा प्रवाह वाढवण्याता सिग्नल देतो. मात्र जेव्हा असं नाही होत, तेव्हा ते स्ट्रेच होत नाही आणि याचाच परिणाम म्हणजे प्रायव्हेट पार्ट लहानच राहतो, असंही या व्यक्तीने सांगितलं. l
दरम्यान, देशात कोरोना विषाणू संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 27 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 47 हजार 417 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 5 हजार 488 वर पोहोचली आहे. देशात 11 लाख 17 हजार 417 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 84 हजार 825 जण कोरोनामुक्त झाले असून देशाचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 13.11 वर गेला आहे.
महाराष्ट्रात काल 46 हजार 723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 32 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात काल 86 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 54 रुग्णांची पुण्यात नोंद झालीये.
महत्वाच्या बातम्या –
“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?, कृपा करून…”
पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर
राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख