‘सेवानिवृत्तीनंतरही कर्मचाऱ्याला….’; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली | बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बँक कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेत काही महत्त्वाची मते नोंदवली आहेत. त्याचे बॅंक कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे.

न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना बँक कर्मचार्‍यांचं पद हे अत्यंत विश्वासार्ह आणि जबाबदार असल्याचं म्हटलंय.

न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती अभय एस. ओक यांच्या खंडपीठाने महत्वाचा निर्णय दिला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कामात चूक केली तर त्याची नोकरीही काढून घेतली जाऊ शकते अर्थात त्याला कामावरून काढले जाऊ शकते. तसेच त्या चुकीची शिक्षा सेवानिवृत्तीनंतरही भोगावी लागू शकते, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

न्यायालयापुढे सुनावणीला आलेल्या संबंधित प्रकरणातील बँकेच्या लिपिकाच्या बडतर्फीचा आदेश खंडपीठाने कायम ठेवला आहे.

सुनावणीदरम्यान खंडपीठाने सांगितलं की, बँकेत काम करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि सचोटी या अत्यावश्यक गोष्टी आहेत. बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची अनियमितता (Irregularity By Bank Employees) असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश खंडपीठाने यावेळी दिले.

कर्मचारी सेवानिवृत्त झाला आहे, या कारणावरून त्याने ड्युटीवर असताना केलेल्या गैरप्रकारांसाठी त्याला माफ करता येणार नाही. सेवानिवृत्तीनंतरही त्याची सुटका नाही, असंही न्यायालयाने सांगितलंय.

आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता, त्याला कोणतीही सूट मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत उदार भूमिका घेतली जाऊ शकत नाही, असंही न्यायालयाने बजावलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादीला मोठा झटका; मालेगावमध्ये झालेल्या अपमानाचा काँग्रेसने घेतला बदला 

मोठी बातमी! बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा गुजरातमध्ये, धक्कादायक माहिती समोर 

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढलं

कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई 

भारतीय गोलंदाजांवर पैशांचा पाऊस; वाचा कोणत्या गोलंदाजाला मिळाली किती रक्कम