मुंबई | मधुमेह हा आज जीवनशैलीचा आजार झाला आहे, तो काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्हता, कारण तेव्हा लोक हेल्दी फूड, लाइफस्टाइल फॉलो करायचे. आता लोकांवर इतके शारीरिक आणि मानसिक ताण, कामाचे दडपण आहे की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासही वेळ मिळत नाही.
रात्रंदिवस एकाच ठिकाणी काम करण्याच्या सवयीमुळे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहत नाहीत आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे मधुमेहाची शक्यताही वाढते.
मधुमेह असणाऱ्या पेशंटच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे.
मधुमेहींना (Diabetic Patients) आंबा फारसा खाता येत नाही, तरी आंब्याची पानं त्यांच्यासाठी वरदानच आहेत. या पानांचं नियमितपणे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. आंब्याच्या पानांमध्ये कोणती पोषणमूल्यं असतात.
मधुमेह आणि कोलेस्टेरॉलच्या (High Colestrol) नियंत्रणासाठी हे घटक फायदेशीर असतात. ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, तसंच ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशांसाठी ही पानं गुणकारी ठरतात.
आंब्याची 10-15 पानं पाण्यात उकळून घ्या. रात्रभर ते पाणी तसंच ठेवून गार होऊ द्या. आंब्याची पानं रात्रभर त्यातच राहू द्या. सकाळी व्यवस्थित गाळून हे पाणी प्या.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेल्सचा एका माणसाचा दिवसाचा खर्च आहे ‘इतका’
शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका!
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…
मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका
सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले