‘…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये’; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई | मधुमेह हा आज जीवनशैलीचा आजार झाला आहे, तो काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्हता, कारण तेव्हा लोक हेल्दी फूड, लाइफस्टाइल फॉलो करायचे. आता लोकांवर इतके शारीरिक आणि मानसिक ताण, कामाचे दडपण आहे की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासही वेळ मिळत नाही.

रात्रंदिवस एकाच ठिकाणी काम करण्याच्या सवयीमुळे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहत नाहीत आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे मधुमेहाची शक्यताही वाढते. अनेक वेळा आहारात जास्त पिष्टमय पदार्थ, गोड, अनारोग्यकारक खाण्याच्या सवयींमुळेही साखरेची पातळी वाढते.

अशा परिस्थितीत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर भाज्यांची निवड काळजीपूर्वक करा. काही भाज्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणारे घटक असतात.

इटिंगवेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, स्टार्च नसलेल्या भाज्यांमध्ये असलेले फायबर दीर्घकाळ समाधानी राहण्यास मदत करते. गाजर ही देखील अशीच एक भाजी आहे, ज्यामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं. व्हिटॅमिन ए समृद्ध गाजर रोगप्रतिकार शक्ती वाढवते तसेच डोळे निरोगी ठेवते. गाजर रक्तातील साखर नियंत्रित करतं. मधुमेही रुग्णांनी याचं सेवन करावं.

भाज्यांमध्ये असलेले फायबर प्रीबायोटिक म्हणून काम करतं. प्रीबायोटिक फायबर हे आतड्यात असलेल्या बॅक्टेरियाद्वारे आंबवले जातात, ज्यामुळे त्यांची भरभराट होण्यास मदत होते.

पालक खात नसाल तर नक्की खा. हिरव्या पालेभाज्या यांसारख्या हिरव्या भाज्या, पालक मधुमेहाच्या रुग्णांसाठी भरपूर पोषक असतात. त्यात कॅलरीज देखील नसतात. तसेच लोह भरपूर असल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. सूप, ज्यूस, भाज्या, मसूर, सॅलड इत्यादींमध्ये तुम्ही पालकाचा समावेश करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या – 

“डॉक्टर हे नालायक, हरामखोर मारखाण्याच्या लायकीचे, त्यांच्याकडे कधी जाऊ नका” 

प्रियंका गांधींचा हटके प्रचार! बाॅडीगार्डसह नेते, कार्यकर्ते रस्त्यावर धावले; पाहा व्हिडीओ 

रशियाचं टेन्शन वाढलं! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली ‘त्या’ महत्त्वाच्या कागदावर सही

“राज्यपालांनी माफी मागावी, अन्यथा वयाचा विचार न करता धोतर फेडू”

संभाजीराजेंच्या हातून सुटलं संयोगिताराजेंचं उपोषण; कार्यकर्त्यांना अश्रू अनावर