…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई | मधुमेह हा आज जीवनशैलीचा आजार झाला आहे, तो काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्हता, कारण तेव्हा लोक हेल्दी फूड, लाइफस्टाइल फॉलो करायचे. आता लोकांवर इतके शारीरिक आणि मानसिक ताण, कामाचे दडपण आहे की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासही वेळ मिळत नाही.

रात्रंदिवस एकाच ठिकाणी काम करण्याच्या सवयीमुळे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहत नाहीत आणि लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे मधुमेहाची शक्यताही वाढते.

या रोगाचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता, 2030 पर्यंत मधुमेह असलेल्या लोकांची एकूण संख्या 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली, तरी सकस आहार घेऊन आणि सक्रिय जीवनशैलीने ती नियंत्रणात ठेवता येते. काही औषधी वनस्पती आहेत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचं सिद्ध झाल्या आहेत.

या वनस्पतींच्या सेवनाने साखरेच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या वनस्पतींमधील अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे अरुगुला.

अरुगुला वनस्पतीला रॉकेट किंवा एरुका वेसिकारिया असेही म्हणतात. त्यांची चव किंचित तिखट असते आणि ती दिसायला काटेरी पानेदार दिसते. ही पाने भाज्या बनवण्यासाठी आणि सॅलडमध्ये हिरव्या भाज्या म्हणून वापरतात.

या भाजीमध्ये नायट्रेट्स आणि पॉलिफेनॉल जास्त प्रमाणात आढळतात. 2014 च्या अभ्यासात असे आढळून आले की, नायट्रेट्सचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला समजावून सांगावं, नाहीतर…” 

“जयंत पाटील भाजपमध्ये येणार होते”; केंद्रीय मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

 ईडीवरून गोंधळ सुरूच! संजय राऊतांचा भाजपला गंभीर इशारा, म्हणाले…

“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”

मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका