मुंबई | जानेवारीत पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसरा हप्ता एप्रिल महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुमच्या अकाऊंटमध्ये हे पैसे जमा होण्यासाठी वेबसाईटवर तुम्हाला 31 मार्चपूर्वी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे.
मध्यंतरी सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड (ration card) देणं अनिवार्य केलं होतं. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांचा रेशन कार्ड क्रमांक, आधार कार्डची (Aadhar card) सॉफ्ट कॉपी, बँक पासबुक आणि घोषणापत्र सादर करावं लागणार असून, या कागदपत्रांशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सरकारने जाहीर केलं होतं.
आता सरकारने लाभार्थ्यांसाठी केवायसी अनिवार्य केलं आहे. त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. या संदर्भातलं वृत्त ‘एबीपी लाइव्ह’ने दिलं आहे.
अनेक अपात्र नागरिक या सरकारी योजनेचा लाभ घेत होते, असं लक्षात आलं. त्यामुळे सरकारने प्रत्येकासाठी ई-केवायसी अनिवार्य केलं आहे.
तुम्ही हे केवायसी केलं नाही, तर 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला 31 मार्चपर्यंत केवायसी पूर्ण करावं लागेल. केवायसी तुम्ही घरी बसून ऑनलाइनदेखील करू शकता.
दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दर वर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
“17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे आमदार जेलमध्ये जाणार”
गुंतवणुकदारांना केलं मालामाल! ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये इतक्या टक्क्यांनी वाढ
मोठी बातमी! ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यावर गुन्हा दाखल
“अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ