पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान

नवी दिल्ली | शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढते. त्यामुळे वडील होण्यात अनेक अडथळे येतात. खराब जीवनशैली, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी इत्यादी अनेक कारणांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता खराब असू शकते.

अनेकदा काही पुरुषांच्या चुकीच्या सवयींमुळे त्यांचे शुक्राणू कमी होणे, गुणवत्ता खराब होणे अशा समस्या उद्भवतात. तुमच्या शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम करणाऱ्या तुम्ही दररोज अनेक चुका करता.

ज्या पुरुषांच्या आहारात पिझ्झा, फ्राईज, मिठाई, सोडा आणि रेड मीट इत्यादी पाश्चात्य पदार्थांचा समावेश असतो, अशा पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या सामान्य आहार घेणाऱ्यांपेक्षा कमी असते.

पुरुषांनी त्यांच्या आहारातून पाश्चात्य आहार वगळला पाहिजे. याशिवाय जे पुरुष जास्त दारू आणि सिगारेटचे सेवन करतात त्यांच्या शुक्राणूंची संख्याही कमी होते.

जर तुम्हाला घट्ट जीन्स, पँट घालण्याची सवय असेल तर तुमची फॅशन स्टाइल बदला. Doctor.NDTV मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्लिम फिट ट्राउझर्स, जीन्स सतत परिधान केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते. घट्ट पँट घातल्याने अंडकोष शरीराच्या जवळ राहतात, ज्यामुळे ते उबदार होतात. हे शुक्राणूंसाठी चांगलं नाही.

तुम्ही भरपूर कार्बोनेटेड पेये खात असाल तर शुक्राणूंची गुणवत्ता खराब होऊ शकते. शुक्राणूंची संख्या कमी देखील होऊ शकते. एक कॅनपेक्षा जास्त कार्बोनेटेड पेय पिल्याने शुक्राणूंच्या गतिशीलतेवर परिणाम होतो. तसेच जास्त बीअर पिल्याने शुक्राणू अस्वास्थ्यकर आणि कमकुवत होऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवं वळण; पुणे कनेक्शन समोर आल्याने खळबळ 

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो”

‘लाथ घातल्यानंतर…; शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली! 

“कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना नोकरी मिळणार नाही”