पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर!

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पुणे पोलिसांनी पूजा आत्महत्या आकस्मिक घडलेली असल्याचं सांगितलं आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला आहे. त्यामध्ये कुठेही तिचा खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती 21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली, असं पोलिस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्यात.

पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे.

21 एप्रिल 2022 रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे यासंदर्भात समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी दाखल केला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टिकटॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूळ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

8 फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उडी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने तणावातून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र या प्रकरणाच्या 12 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुळात एकंच खळबळ उडाली.

महत्त्वाच्या बातम्या- 

देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट! 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

“तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत” 

“106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट