नांदेड | बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत हत्या केली. आता या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आरोपी फरार झाले होते.हत्येचा सुगावा लागत नसल्याने अखेर पोलिसांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केली होती.
या एसआयटी पथकाचे प्रमुखपदी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची नेमणूक केली होती.या पथकात 20 अधिकारी 60 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
बियाणी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सहा राज्यात पथके पाठवण्यात आली होती. विदेशात देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता.
दहशतवादी रिंदा उर्फ हरविंदरसिंग संधू याचाच या हत्येच्या कटात हात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर होते. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन
केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा
पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा!
केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच…
LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त