‘…तर पुतिन यांची हत्या होऊ शकते’; अमेरिकेच्या माजी जनरलचा अत्यंत खळबळजनक दावा

मुंबई | रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन युद्ध जिंकायचं आहे. त्यासाठी रशियन सैन्य काही शहरांवर नव्याने हल्ले करत आहे. मात्र या युद्धाचा फटका रशियालाही बसला आहे. अशात अमेरिकेच्या माजी जनरलने केलेल्या दाव्याने खळबळ माजलीये.

रशियामध्ये लष्करी सत्तापालट होण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेच्या माजी जनरलने केला आहे. पुतीन यांना सत्तेवरून हटवल्यास त्यांची हत्या होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलंय. यामुळे खळबळ माजली आहे.

पुतिन सत्तेत राहण्यासाठी काहीही करतील. पुतीन कुठेही जात नाहीत हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. पुतिन यांना माहित आहे की जर कोणी सत्तेवर आले तर ते जिवंत राहणार नाहीत, असंही जनरल जॅक केन  म्हणालेत.

पुतिन यांचं ध्येय कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहणं आहे. सत्तेसाठी तो काहीही करेल. पुतिन यांना माहीत आहे की त्यांच्या जागी दुसरं कोणी आलं तर त्यांचा अंत निश्चित आहे, असं जनरल जॅक केन म्हणालेत.

पुतिन सत्तेत राहण्यासाठी लढा देत आहेत आणि त्याचवेळी ते त्यांच्या ध्येयावर ठाम आहेत, त्यामुळेच त्यांचं लक्ष युक्रेनवर आहे. त्याला अजूनही युक्रेनचा ताबा घ्यायचा आहे, असं त्यांनी म्हटलंय.

मी पुतीन यांना गांभीर्याने घेतो. आम्ही त्यांना अनेकदा सूट दिली आहे, परंतु त्यांना पुन्हा एकदा रशियन साम्राज्य परत आणायचं आहे. पुतीन अध्यक्ष नसतील तर त्यांना भविष्य नाही हेही खरं आहे, असं केन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“साहेब हृदयावर हात ठेवून सांगा…”; संदीप देशपांडे भावूक 

 ‘आगामी निवडणुकीत भाजप 27 टक्के तिकीटे ओबीसींना देऊन समाजाला न्याय देईल’

हनुमान चालीसा प्रकरण! दिलासा मिळाल्यानंतरही रवी राणांची आजची रात्र तुरूंगातच

“1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेल”

अडीच वर्षे तुम्ही काय केलं? पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल