नांदेड | बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत हत्या केली. आता या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र सापडल्याची माहिती मिळतेय. निनावी पत्रात बियाणी यांच्या हत्येसंदर्भात माहिती देण्यात आली.
बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत बनला आणि त्यामागे एका वाळू माफियाचा हात आहे, अशी धक्कादायक माहिती या पत्रातून समोर आली आहे.
हे पत्र हिंदीमध्ये लिहिण्यात आलंय. हिंदी भाषेतून पाठवण्यात आलेल्या या पत्रात लिहलंय की, बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुआ, जिसमे आनंद नगर से बहुत बडा दादा पांडुरंग येवले परभणी मे आया था. जिसने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नही करते. जिसेने परभणी से आणे का मनसुबा करा, मकसद था, बिल्डर के काम मे कोई नही रहेना, असं या पत्रात सांगण्यात आलंय.
संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर होते. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बियाणी घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
मंत्री धनंजय मुंडेंच्या तब्येतीसंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती!
“राज ठाकरेंच्या सभांमुळे करमणूक होते, त्यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”
‘…त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं’; शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला
सर्वात मोठी बातमी; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
‘काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे’; पंकजा मुंडेंचा भावाला प्रेमाचा सल्ला