‘ग्रुप SEX करण्यास नकार दिल्याने…’; 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

जयपूर  | जयपूरमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. भरतपूर येथील काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी एका 19 वर्षीय विद्यार्थिनीला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विष देऊन ठार मारलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला विष पाजण्याचं एकमेव कारण म्हणजे तिने मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता.

मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हलेना पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनेसंदर्भात एफआयआर दाखल केला असला तरी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाहीत.

भरतपूर येथील एका खासगी महाविद्यालयात शिकत होती, तिथे तिच्यासोबत शिकणारे पाच विद्यार्थी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होते आणि जेव्हा पीडितेने तसे करण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी तरुणीला विष पाजले.

मृत विद्यार्थिनीने तिच्या आईला फोन करुन काही मुले तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत असल्याचं सांगीतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुलगी महाविद्यालयातून घरी परतत असताना आरोपी विद्यार्थ्यांनी तिचा पाठलाग करून जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजलं.

घरी आल्यानंतर मुलीला उलट्या होऊ लागल्याने तिच्या आजोबांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या-  

“हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग…” 

“आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही” 

अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी!

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एक मोठी कारवाई 

  Maharashtra Kesari 2022: कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी