Top news

फेस सर्जरी करणं ‘या’ अभिनेत्रीला पडलं महागात, आता अशी झाली चेहऱ्याची अवस्था, पाहा फोटो

Photo Credit - Raiza Wilson / Instagram

मुंबई| प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. अधिक सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया आता नवीन राहिलेल्या नाहीत. अनेक जण-विशेषत: तरुणाई हे उपचार करून घेते. अलीकडे तमिळ अभिनेत्री राझया विल्सनसोबतही असचं काहीसं घडलं आहे.

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री रायझा विल्सननं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तिच्या चेहऱ्यावर एक काळा डाग दिसत आहे. तसेच तिच्या एका डोळ्याखालीसुद्धा सुज आलेली दिसत आहे.

रझियाने इन्स्टाग्रामवर सांगितले की, तिला फेस सर्जरी करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, असे असूनही डर्मेटोलॉजिस्टने तिला फेस सर्जरी करण्यास सांगितले आणि तिच्या चेहर्‍यावर शस्त्रक्रिया केली. सोशल मीडियावर, अभिनेत्रीने तिच्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रझियाच्या डाव्याजवळ सूज दिसत आहे. तसेच तिच्या त्वचेचा रंगही बदलला आहे.

या रायझानं हे देखील स्पष्ट केलं आहे की, हे सर्व ज्या डॉक्टरमुळे झालं आहे त्याच्याशी आता तिचा संपर्क होत नाहीये. एवढं सर्व झाल्यानंतर ते आता मला भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी तयार नाही. त्यांच्या स्टाफचं म्हणणं आहे की, ते आता शहरात नाहीत.’

चित्रपटांमध्ये सौंदर्यांची छाप सोडणाऱ्या रायजाला एक फेस सर्जरी करणं महागात पडलं आहे. ज्यामुळे आता तिला एका नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

रायजानं 2017 मध्ये आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. पहिल्यांदा ती दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट VIP-2 मध्ये दिसली होती. त्याचबरोबर ‘बिग बॉस तमिळ’ या टीव्ही कार्यक्रमात स्पर्धक म्हणून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

दरम्यान, शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांशी सविस्तर बोलून त्यातील संभाव्य धोके विचारून घ्या, तुमच्या मनात तुम्हाला शस्त्रक्रियेचा काय परिणाम अपेक्षित आहे, याविषयीही बोला.

एखाद्या ठिकाणी केवळ स्वस्तात कॉस्मेटिक शस्त्रक्रिया होतेय म्हणून शस्त्रक्रियेची घाई नको. या शस्त्रक्रिया रुग्णालयातच करणे आवश्यक असते. अचानक काही गुंतागुंत झाली तर त्यावर रुग्णाला तात्काळ व योग्य वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raiza Wilson (@raizawilson)

महत्वाच्या बातम्या – 

‘….म्हणून दिखावा करण्याची काही गरज नाही’,…

पाकिस्तानी रॅपरनं आलिया भट्टवर बनवलं रॅप; रॅप ऐकून आलिया…

‘तीन मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा’,…

12 वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न का केलं? सैफ अली खाननं…

‘या’ अभिनेत्रीला एकदा सोडून दुसऱ्यांदा झाली…

IMPIMP