तंत्रज्ञान

5 कोटी लोकांवर सायबर हल्ला; फेसबुक वापरत असाल तर नक्की वाचा

नवी दिल्ली : 5 कोटी फेसबुक खात्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फेसबुकने यासंदर्भात खुलासा केला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याचं कळतंय.

हॅकर्सनी फेसबुकच्या View as फीचरच्या कोडवर अटॅक केला आणि प्रोफाईल टेक ओव्हर केले, त्यामुळे त्यांना पासवर्डची गरज पडली नाही. गुरुवारी रात्री फेसबुकने यावर नियंत्रण मिळवलं.

फेसबुकच्या 5 कोटी अकाऊंटना सायबर हल्ल्याचा फटका बसल्याची माहिती आहे. फेसबुकने यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं आहे.

हॅकर्स कोण होते? त्यांनी फेसबुक युझर्सचा डाटा चोरला की नाही? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.

दरम्यान, फेसबुकने पहिल्या टप्प्यात 90 लाख आणि त्यानंतर सुमारे 4 कोटी लोकांचे अकाऊंट लॉग आऊट केले होते. युझर्सचे अकाऊंट का लॉग आऊट झाले याची माहिती देण्यात येईल, असं फेसबुकने सांगितलं आहे.

IMPIMP