तंत्रज्ञान देश

फेसबुकमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; महिन्याला 4 लाख रुपये पगार

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्कींग वेबसाईट असलेल्या फेसबुकने भारतीय तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. फेसबूकनं काही दिवसांपूर्वी दहशतवाद संबंधित आणि अश्लील मजकूट हटवण्यासाठी 20 हजार कंटेंट मॉडरेटर्सची नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी फेसबुकनं आता उमेदवारांची निवड करण्यास सुरुवात केली आहेत. फेसबुकच्या या नोकरीसाठी अनेक भारतीय तरुणांनी उत्सुकता दाखवली असून हजारो तरुणांनी अर्ज देखील केले आहेत. 

प्रादेशिक भाषा येणाऱ्यांना प्राधान्य-

फेसबुकला जे कंटेट मॉडरेटर्स हवे आहेत ते प्रादेशिक भाषा येणारे हवे आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यात जी प्रादेशिक भाषा असेल ती येणाऱ्यांनाच फेसबुक प्राधान्य देणार आहेत. या नियुक्त्या करण्यासाठी फेसबुकनं बिजनेस प्रोसेस मॅनेजमेंट कंपनी जेनपॅक्टला कंत्राट दिलं आहे. ही कंपनी मराठी, पंजाबी, तमीळ, कन्नड, उडिया, नेपाळी या भाषांसाठी कंटेंट मॉडरेटर्स कामावर घेणार आहे. ‘जेनपॅक्ट’नं ऑनलाईन एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन एम्लॉयमेंटच्या माध्यमातून कुणालाही हे अर्ज करता येतील. 

काम नेमकं काय असणार?

फेसबुक ज्यांना मॉडरेटर म्हणून नियुक्त करणार आहे त्यांच्याकडे एक खास काम सोपवण्यात येणार आहे. यूजरनं फेसबुकवर टाकलेला मजकूर आणि व्हीडिओला मॉनिटर आणि मॉडरेट करण्यात येईल. लैंगिक शोषण, दहशतवाद, लहान मुलांचं लैंगिक शोषण, आत्महत्येचा लाईव्ह व्हिडिओ आणि हिंसात्मक अशा मजकुरांवर फेसबुक कारवाई करणार आहे. फेसबुकवर टाकलेला असा मजकूर डिलीट किंवा ब्लॉक करण्याचं काम मॉडरेटरला करावं लागणार आहे.

कंटेंट मॉडरेटर्सना पगार किती?

फेसबुक ही जगभरातील चांगला पगार देणाऱ्यांपैकी एक कंपनी आहे. त्यामुळे फेसबुकने या पोस्टसाठी देखील चांगला पगार ठेवला आहे. चांगला म्हणजे किती तर थेट लाखात. एका कन्टेन्ट मॉडरेटरला वर्षाला 2.5 लाख रुपये ते 4 लाख रुपयांचं पॅकेज मिळू शकतो. शिवाय हाच तुमचा फायनल पगार असणार नाही. फेसबुक याशिवाय कर्मचाऱ्यांना उत्तेजन म्हणून काही भत्ते देत असतं. महिन्याच्या महिन्याला कर्मचाऱ्यांना हे भत्ते दिले जातील. चांगलं काम करणाऱ्यांनाच हे प्रोत्साहनपर भत्ते दर महिन्याला मिळतील.