फेसबुकवर पैसे कमवण्याची संधी; पाहा नेमकं काय करावं लागेल!

फेसबुकचा वापर टाईमपास करण्यासाठी होतो, असा जर तुमचा समज असेल तर आता तो खोटा आहे. कारण फेसबुकने आता आपल्या यूझर्सना पैसे कमवण्याची संधी दिली आहे. फेसबुक वॉच नावाने फेसबुकने आपला व्हीडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. सध्याच्या फेसबुक अॅपच्या वरच्या भागात व्हीडिओचं बटण दिसतं तोच हा ऑप्शन. अमेरिकेत ही सेवा 2017 मध्येच सुरु झाली होती. अमेरिकेशिवाय ब्रिटन, आर्यलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये ही सेवा पुरवण्यात येत होती. मात्र आता जगभरातील वापरकर्त्यांसाठी फेसबुकने ही सेवा सुरु केली आहे. फेसबुकचा वापर व्हिडिओ शेअर करण्यासाठी करतात त्यांना या सेवेचा फायदा होणार आहे.

नक्की काय आहे संकल्पना?-

गुगलच्या युट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबुकने ही नवीन सेवा सुरु केली आहे. ज्याप्रमाणे युट्युबवर चांगले सबस्क्रायबर आणि व्ह्यूव्ज असल्यावर जाहिराती मिळतात, अगदी त्याचप्रमाणे चांगले फॉलोवर्स आणि व्ह्यूव्ज असतील तर फेसबुक वॉचवरही जाहिराती मिळू शकणार आहेत.

“व्हि़डिओ स्ट्रिमिंग सेवेमुळे पब्लिशर्स आणि कंन्टेंट क्रिएटर्सला त्यांच्या व्हिडिओजसाठी आंतरराष्ट्रीय बाजार मिळत आहे. यामुळे युझर्सला कमाई करण्याची संधी मिळेल. कमाईचा 55% भाग युझर्संना मिळेल तर 45% भाग फेसबुक स्वतःकडे ठेवणार आहे. वॉच लॉन्चिंगसोबत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पब्लिशर्स आणि क्रिएटर्सला दोन्ही प्रकारे मदत करु इच्छित आहे. पहिले म्हणजे युजर्सला व्हिडिओच्या माध्यमातून कमाई करता यावी आणि दुसरे म्हणजे आपला कन्टेंट कसा चालतोय, याचा अंदाज युझर्संना येईल.

 

फेसबुकच्या या सेवेत युझर्संना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि युट्यूबप्रमाणेच व्हिडिओ कन्टेंट मिळेल. याच्या मदतीने युजर्स फेसबुकवरच वेब सिरीज, पॉपुलर व्हिडिओ आणि टीव्ही शोज पाहू शकणार आहेत.

पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

-तुमच्याकडे एक फेसबुक पेज असावे लागले. नसेल तर तुम्हाला ते तयार करावे लागेल. या फेसबुक पेजवर युजर्संना कमीतकमी 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवावा लागेल. 2 महिन्यांच्या आत या व्हिडिओला 30 हजार लोकांनी कमीतकमी मिनिटभर तरी पाहायला हवं. याशिवाय फेसबुक पेजवर कमीत कमी 10 हजार फॉलोअर्स असायला हवेत. ( लक्षात ठेवा व्हीडिओ कंन्टेंट स्वतः तयार केलेला असावा. दुसऱ्यांचे व्हीडिओ टाकून प्रयत्न करण्याचा विचार असेल तर तो सोडून द्या. कारण त्यामुळे तुम्हाला पैसे तर मिळणार नाहीतच शिवाय कॉपीराईच उल्लंघनाची केस बसल्यास समस्येचा सामना करावा लागू शकतो )

-वरील अटी तुमच्या पेजनं पूर्ण केल्या असतील तर तुम्ही फेसबुकच्या पैसे कमवण्याच्या योजनेसाठी अर्ज करु शकता. https://www.facebook.com/help/publisher/943230709179046 या लिंकचा वापर करुन तुम्हाला हा अर्ज करता येईल. त्याआधी याच लिंकवर तुम्हाला तुमचं पेज सर्व अटी पूर्ण करतं की नाही ते पाहता येईलय. 

-भारतात ही सेवा अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरु झालेली नाही. काही जणांना यासाठी अर्ज करता येत आहेत. तर सर्व अटी पूर्ण असूनही काही जणांना ही सेवा वापरता येत नाहीये. त्यामुळे यासाठी काही जणांना आणखी थोडी वाट पाहावी लागू शकते.