कठोर अन् प्रेमळ… प्रेरणादायी अन् उर्जावान… अशा शब्दात फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंना वाहीली आदरांजली

मुंबई | आज शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्ताने त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर आदरांजली वाहत आहेत. यातच चर्चा झाली ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटची.

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्वीटरवरुन एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. बाळासाहेबांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील, असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट करताना ‘हिंदुहृदयसम्राट’ हा उल्लेख फडणवीस यांनी आवर्जून केला आहे.

शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी नेहमीच आदरस्थानी राहिले आहेत. युती तुटल्यानंतरही भाजपचे नेते बाळासाहेबांची आठवण काढत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, कठोर अन् प्रेमळ…प्रेरणादायी अन् उर्जावान, असं बाळासाहेबांचं वर्णन करत बाळासाहेबांना मानवंदना देणारी 2 ट्वीट फडणवीसांनी केली आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-