“चूक झाल्याचं फडणवीसांनी कबूल केलं”; विक्रम गोखलेंचा मोठा गोप्यस्फोट

पुणे | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील वारजे येथे ब्राम्हण महासंघाच्या वतीने विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विक्रम गोखले यांनी अनेकविध विषयांवर भाष्य केलं आहे.

शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यायला हवं. ज्या कारणाने बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा मला प्रत्यय आला आहे, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

तसेच विक्रम गोखले यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण झालं असल्याचं  देखील सांगितलं आहे.  शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. तेव्हा चूक झाली असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट विक्रम गोखले यांनी केला आहे.

यावेळी विक्रम गोखले यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ज्या बाळासाहेबांची भाषण ऐकूण महाराष्ट्र 40 वर्षे तृप्त झाला आहे त्या बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकारणामधले खेळ सुरू आहेत, ते विचित्र स्तरावर पोहोचले आहेत, अशी टीका विक्रम गोखले यांनी केली आहे.

हे गणित चुकलेलं आहे. हे जर सुधरायचं असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असंही विक्रम गोखले म्हणाले आहेत. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत मी पुढाकार घेतला आणि घेईन, असं विक्रम गोखले यांनी सांगितलं.

मतपेट्यांचं राजकारण करणारे यांच्यामुळे हिंदू- मुस्लिम, दलित, ब्राम्हण यांच्यात वाद होतील. मराठी माणूस भरकटला जातोय, लोकं अस्वस्थ आहेत. प्रसार माध्यमांना याची फारशी कल्पना नसेल, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

आमच्यासारखी माणसं बाहेर पडतात तेव्हा सर्व क्षेत्रातील लोकांशी आमचा संबंध येतो तेव्हा प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की, हे गणित चुकलेलं आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये जे काही झालं असेल त्यांनी लोकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका लोकं संतापली की खुप शिक्षा करतात, असं विक्रम गोखले म्हणाले आहेत.

विक्रम गोखले यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत पाटील यांनी आम्ही उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती घ्या, असं म्हटलं होतं. परंतु, आमच्याकडून कुठलीही चुक झाली नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

या  देशाच्या लोकशाहीची सुंदरता हीच आहे की, कोणीही काहीही बोलू शकतो. विक्रम गोखले यांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं. आम्हाला आमची कुठलीही चुक वाटत नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

हजारो कोटींची कमाई पण कर मात्र शुन्य; असं का?, वाचा सविस्तर

“कंगणा जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचं”

“खरंच हिंदू खतरे में है तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा” 

“…तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का?”