“अजित पवार ऐकत नाहीत पण बडे साहब सब देख रहे है”; फडणवीसांकडून आरोपांची सरबत्ती

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली.

संजय राऊत याच्या टीकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता राज्य विधिमंडळात सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरलं आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना एका खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी राज्याचे सरकारी वकील काम करत होते. सर्व पुराव्यानिशी आपण हे आरोप करत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

गिरीश महाजन यांच्यावर त्यांच्या खाजगी सहाय्यकाच्या माध्यमातून कारवाई करण्याचं काम सरकार करणार होतं, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केल्यानं राज्यात खळबळ माजली आहे.

सरकारी वकीलांनी महाजन आणि भाजपच्या इतर नेत्यांवर कारवाई करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला होता. त्यानूसार सर्व रेकाॅर्ड आपण सभागृहात देत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीसांनी सभागृहात सरकारी वकीलांवर आरोप करतानाच अजित पवारांचं देखील एका व्हिडीओत नाव असल्याचा खुलासा केला आहे. फडणवीसांनी तब्बल सव्वाशे तासांचे व्हिडीओ फुटेज विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे.

अजित पवार सपोर्ट करत नाहीत. पण बडे साहब सब देख रहे है, कुणी चांगले अधिकारी आहेत का, चार-पाच चांगले अधिकारी सुचवा त्यांनाच आपण अपाॅंइट करून काम करून घेऊ, असं सदरील व्हिडीओत वकील बोलत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांनी विधानसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य पोलीस दलावर इतक्या मोठ्या प्रमाणात आरोप झाल्यानं खळबळ माजली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावण्यास मागे पुढे पाहणार नाही”

“ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन”, राऊतांचा हल्लाबोल

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा”

Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट 

शिवसेनेच्या 25 आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…