बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचा ताजा भाव

मुंबई | केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केला आहे. त्यानंतर अनेक क्षेत्रात बदल दिसायला लागले आहेत. शेअर बाजारातील बदलानंतर आता सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे.

भारतीय सराफा बाजार हा इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या देशात बाजारभाव घसरत आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बुधवारी बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण पहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात मोठी घसरणा झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सोनं 246 रूपयांनी स्वस्त झालं आहे.

चांदीचा भाव 235 रूपयांनी घसरला आहे. दिवसाअखेर चांदी 61,375 प्रतिकिलो इतक्या किमतीवर होती. तर सोनं प्रतितोळा 48 हजार 8 रूपये किंमतीवर आलं आहे. परिणामी सध्या ग्राहकांचा बाजाराकडं कल वाढत आहे.

आयबीजेएनूसार देशात अर्थसंकल्पाचा फायदा किंवा तोटा असा काही प्रभाव म्हणावा असा जाणवला नाही. परिणामी बाजारात सोनं-चांदीच्या दरांमध्ये घट पाहून ग्राहक बाजारकडं वळत आहेत.

देशात आयबीजेकडून सतत सोने-चांदीचे बाजारभाव प्रसिद्ध केले जातात. अशात सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बाजारभाव दिले जात नाहीत. विशेषत: शनिवार आणि रविवार या दिवशी बाजारभाव सादर केले जात नाहीत.

सोने-चांदी बाजारात काही महिन्यांपूर्वी बाजारभावानं उच्चांक गाठला होता. सोने विक्रमी उंचीवर गेलं होतं. परिणामी परत एकदा त्या उंचीवर सोनं जाणार का याची उत्सुकता सर्वांना यावर्षी लागली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या भावात तितकी घसरणं नोंदवली गेली नव्हती. पण मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर सोने-चांदीच्या भावात घसरण पहायला मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ना चौकार ना षटकार, अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना पठ्ठ्यांनी मॅच जिंकली; पाहा व्हिडीओ

BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता

 रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’