सिनेसृष्टीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचं निधन

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते शिव कुमार सुब्रमण्यम यांचं आज निधन झालं आहे.  आज त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिवकुमार सुब्रमण्यम काही दिवसांपूर्वी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या सिनेमात दिसले होते. या सिनेमात अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​मुख्य भूमिकेत होती.

शिवकुमार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या निधनाची बातमी चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी दिली आहे.

दु:खद अशी गोष्ट म्हणजे दोन महिन्यांपूर्वी शिव सुब्रमण्यम यांच्या मुलाचंही निधन झालं होतं. त्यांचा मुलगा जहानचा ब्रेन ट्यूमरमुळे मृत्यू झाला होता. यासंदर्भात बिना सरकार यांनी ट्विट शेअर केलंय.

‘टू स्टेट्स’ या चित्रपटातील शिव कुमार यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. तसंच ‘परिंदा’ आणि ‘हजारो ख्वाइशे ऐसी’ या चित्रपटांसाठी शिव कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

नेटफल्किसवर प्रदर्शित झालेला ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. 11 वाजता मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत” 

“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचं नुकसान करतायेत” 

महाराष्ट्राला हादरवलेल्या चंद्रपूरपमधील ‘त्या’ मुलीच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर! 

“भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत” 

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महत्त्वाची माहिती समोर