मोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध माजी कर्णधारावर आयसीसीनं घातली साडेतीन वर्षांची बंदी

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट आहे. भारतातील क्रिकेटवर नियंत्रण ठेवण्याचं काम बीसीसीआय करत असतं. परिणामी प्रत्येक गैरव्यवहाराची जबाबदारी देखील बीसीसीआयची असते. अशात जगप्रसिद्ध खेळाडूवर बंदी लावण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी फिक्सिंगच्या एका प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या झिम्बाब्बेच्या माजी कर्णधार ब्रेंडन टेलरवर आयसीसीनं साडेतीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. टेलर या काळात कसलंही क्रिकेट खेळू शकणार नाही.

आयपीएलला जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखल जातं. सध्या बीसीसीआय आयपीएल 2022 च्या हंगामाच्या आयोजक व्यस्त असताना झिम्बाब्बेच्या माजी कर्णधारानं मोठा गौप्यस्फोट केला होता.

एका भारतीय व्यावसायिकासोबत झालेल्या भेटीदरम्यान मूर्खपणे कोकेन घेतल्यावर मॅच फिक्सिंगमध्ये ब्लॅकमेल केल्याचा आरोप झिम्बाम्बेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलरनं केला होता. परिणामी आयसीसीनं ही कारवाई केली आहे.

या प्रकरणाची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला म्हणजेच आयसीसीला वेळेत दिली गेली नाही. परिणामी त्याच्यावर अनेक वर्षांची बंदी लावली जाण्याची शक्यताही टेलरनं काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती.

एका भारतीय उद्योगपतीने त्याला भारतात प्रायोजक करण्यासाठी आणि झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी स्पर्धेच्या संभाव्य योजनांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. परिणामी सध्या तो उद्योगपती कोण? हा प्रश्न बीसीसीआयला देखील पडला आहे.

टेलरनं व्यावसायिकाचे नाव उघड केले नाही परंतु सांगितले की त्याला ऑक्टोबर 2019 मध्ये 15,000 डॉलरची ऑफर देण्यात आली होती. परिणामी टेलरच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट जगतामध्ये खळबळ माजली आहे.

मला भारतातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तींशी बोलावं लागल्याचं टेलर म्हणाला आहे. पण मला या गोष्टीचं खूप वाईट वाटल्याचं आणि मला मानसिक तणावाबाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपचार करावे लागल्याचा खुलासा देखील टेलरनं केला होता.

दरम्यान, ब्रेंडन टेलरवर आयसीसीनं कारवाई केल्यानं काही वर्षांपूर्वी देशात आयपीएलच्या स्पाॅट फिक्सिंगच्या प्रकरणानं घातलेल्या गोंधळाच्या काळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “…त्यावेळी भारतीय क्रिकेट कणाहीन बनेल”; रवि शास्त्रींचं मोठं वक्तव्य

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…