नेहा कक्करने शेअर केला हनिमूनचा ‘तो’ फोटो, चाहत्यांनीही दिलं भरभरून प्रेम

मुंबई| प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच आपल्या गाण्याने लोकांची मनं जिंकत असते. काही दिवसांपूर्वीच नेहा विवाहबंधनात अडकली आहे. नेहा एक सुंदर गायिका आहे आणि तीने तिचा पार्टनर पण तसाच शोधला आहे. पंजाबी गायक रोहन प्रित सिंग याच्याबरोबर आॅक्टोबर महिन्यात तीने लग्न केलं आहे.

नेहा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. नेहा नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. तिने लग्न झाल्यावरही तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. यानंतर तिचे चाहतेही आंनदी झाले होते. चाहत्यांनी त्या फोटोला प्रचंड लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

आता नेहाने तिच्या हनिमुनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. नेहा तिच्या चाहत्यांना नेहमी खुश ठेवन्याचा प्रयत्न करत असते. नेहाने आता शेअर केलेला फोटोत नेहा रोहनप्रितला किस करत आहे. तिने त्या फोटोला हनिमून डायरीज असं कॅप्शन दिले आहे.

नेहाच्या या फोटोला सोनू कक्कर आणि टोनी कक्करने ‘ओय होय कितने सुंदर है’ अशी कमेंट्स केली आहे. रोहनप्रित आणि नेहा सध्या दुबईत हनिमुन साजरा करत आहेत. रोहनप्रितने नेहासाठी ‘आय लव यू’ लिहीलं आहे आणि त्याची डिझाईन कॅंडल लाईटने केली आहे.

दरम्यान, नेहाने तिच्या नावापुढे आता सिंग लावलं आहे. नेहाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही ओळख चाहत्यांना सांगितली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘नेहु दा ब्याह’ या गाण्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा अजूनच रंगली होती.

या गाण्यात नेहासोबत गायक रोहनप्रीतही झळकला होता. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतचे लग्न दाखवण्यात आले होते. त्यामुळे तिचे चाहते बुचकळ्यात पडले होते. गाण्यात नेहाचे लग्न दाखवल्याने ती खरंच लग्न करतेय की केवळ गाण्यासाठी हा सगळा ड्रामा करतेय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता.

मात्र खुद्द नेहानं लग्नाच्या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसला होता. रोहनप्रीत सिंग ‘रायझिंग स्टार’ या गायन रिअॅलिटी शोमध्ये पहिला रनरअप होता. तो ‘बिग बॉस’मध्येही दिसला होता.

रोहनच्या आवाजाने त्याने अनेकांच्या मनात जागा मिळवली आहे. सध्या नेहा आणि रोहनप्रीत दोघेही सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत आहेत. लोकांनाही या दोघांची जोडी चांगलीच आवडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बायकोनेच माझ्या खु.नाची सुपारी दिली’; ‘या’ बड्या भाजप नेत्याचा पत्नीवर धक्कादायक आरोप!

आयकर विभागाची मोठी कारवाई! पृथ्वीराज चव्हाण गजाआड जाणार?

तुम्हाला आवडणारी मुलगी पळवून आणू असं म्हणणाऱ्या ‘त्या’ भाजप नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बे.ड्या!

आता कंगनाचं काय खरं नाही! पोलिसांची सलग तिसऱ्यावेळी कंगनाविरुद्ध मोठी कारवाई

आता अभिनेता अमित साधसुद्धा सुशांतवर बोलला; ‘त्या’ विमान प्रवासाची आठवण काढत म्हणाला…