मिताली मयेकरच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई | अभिनेञी मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेञी आहे. मिताली मयेकर सध्या तिच्या चांगलीच चर्चेत आहे. मराठी चिञपट आणि मालिकांमध्ये साकारलेल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे मितालीने प्रेक्षकांची मने जिंकली.

मिताली मयेकरने नुकतचं मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. मिताली मयेकर आणि सिध्दार्थ चांदेकर यांना मनोरंजन विश्वातील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जोडी म्हणून ओळखली जातं.

मिताली मयेकर कायम सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नुकताच तिने तिच्या इंन्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने मराठमोळा लूक केला असून, मितालीच्या या नऊवारी साडीतील लूकनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतल.

नुकत्याचं झालेल्या ‘झी मराठी अवॉर्ड’ या कार्यक्रमासाठी मितालीने अनोखा लूक केला होता. तिनं पारंपारिक मराठमोळा साजशृंगार केला होता. नऊवारी साडी ,त्यावर नथ, पारंपारिक दागिने आणि मराठमोळा फेटा असा तिचा साज अगदीच प्रेमात पाडणारा होता.


सध्या मिताली ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत ‘कस्तुरी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच तिनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मिताली छोट्या पडदयावरील लोकप्रिय अभिनेञी असून ती सतत कोणत्या नाकोणत्या विषयावरुन चर्चेत असते. तिने केलेल्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी चांगलीचं पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, मितालीने मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय सिध्दार्थ चांदेकर याच्यासोबत 24 जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली. पुण्यातील ढेपे वाडा याठिकाणी अत्यंत पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. कुटुंबीय,मिञमैञीणीआणि अनेक दिग्गजांनी मोठ्या थाटामाटात या दोघांचा लग्न सोहळ्याला हजेरी लावली.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे जोडप्यानं आपल्या शेजाऱ्यांना…

‘काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून…

आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

जुलियो रिबेरोंनी शरद पवारांचा ‘हा’ प्रस्ताव…

सेकंड हँड कार घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या…