फराह खानने सलमान खान बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली…

मुंबई | अभिनेता सलमान खान हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक खूप मोठं नाव आहे. आज जगभरात सलमानचे लाखो चाहते आहेत. सलमान त्याच्या व्यावसायिक आयुष्यबरोबरच वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो.

सलमानच्या पर्सनल आयुष्यात काय घडतंय, हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या चाहत्यांना असते. सलमानच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी माध्यमांमध्ये सतत समोर येत असतात. अशातच कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान हिने सलमानच्या आवडत्या पदार्थांबद्दल खुलासा केला आहे.

नुकतंच फराह खान एका शोमध्ये पोहचली होती. या शोमध्ये फराहने सलमान खानला काय खायला आवडतं याविषयी सांगितलं आहे. सलमानला सर्वकाही खायला आवडतं, असं फराह म्हणाली आहे.

सलमान खान एकमेव अभिनेता आहे जो सर्वकाही गोष्टी खाणे पसंत करतो. सलमानला भात, बिर्याणी, छोले सर्वकाही खाण आवडतं, असा खुलासा फराहने यावेळी केला आहे. तसेच फराहने यावेळी अभिनेता शाहरुख खानच्या खाण्याविषयी देखील खुलासा केला आहे. शाहरुख खाण्यात कोणत्या कोणत्या गोष्टी टाळतो, हे फराहने सांगितलं आहे.

शाहरुखविषयी बोलताना फराह खान म्हणाली की, शाहरुख खाण्याच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. तो अनेक गोष्टी पाळतो. शाहरुख फक्त जास्तीत जास्त तंदुरी चिकन खातो. शाहरुखला मी केव्हाच रोटी, भाकरी किंवा भात खाताना पाहिलं नाही.

दरम्यान, बॉलिवूड मधील प्रत्येकच कलाकार हे खाण्याच्या बाबतीत स्ट्रिक्ट असतात. अनेक कलाकार चांगलं दिसण्यासाठी बऱ्याच गोष्टी खाणे टाळतात. मात्र, सलमान एकमेव अभिनेता आहे जो आहाराबाबत विचार करत नाही.

महत्वाच्या बातम्या-

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला

…म्हणून भर ऑफिसमध्ये बहिणीनेच बहिणीला धो धो धुतलं, पाहा व्हिडीओ

वर्षभर सेक्स न करताही गर्भवती राहिली तरुणी? पोटदुखीमागे डॉक्टरांनी सांगितलं गजब कारण

मोठ्या बसला ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

पगार नाही दिला म्हणून कर्मचाऱ्यानी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ