मी उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार… ते मंदिर बांधतील, मी मशीद बांधेन; आझमी पुत्राचा एल्गार

मुंबई |  मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहे. ते राम मंदिर बांधतील तर मी मशीद बांधेन, असं वक्तव्य सपाचे आमदार अबू आझमी यांचे सुपुत्र फरहान अख्तर यांनी केलं आहे. माझ्या वक्तव्याला तुम्ही इशारा समाजा किंवा धमकी समजा, असंही सांगायला फरहान विसरले नाहीत.

जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसून राम मंदिर उभारण्याची घोषणा करत असतील तर मी देखील त्यांच्यासोबत जाणार. शिवाय मी माझ्या वडिलांना देखील माझ्यासोबत येण्याचा आग्रह करणार आहे, असंही फरहान आझमी यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्या दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा म्हणजे राज्यातल्या मुस्लिम आणि दलितांना घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न असल्याचंही फरहान म्हणाले आहेत.

7 मार्च रोजी उद्धव ठाकरे अयोध्य दौऱ्यावर असणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सगळे खासदार देखील असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“आदित्यसाहेब, आता फक्त म्हातारीच्या बुटाचा हट्ट करू नका म्हणजे मिळवलं”

-मी तर माझी बॅग पॅक करून ठेवली होती पण…..- रोहित शर्मा

-मशिदींना हात लावल्यास मी मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील- आठवले

-“इस्रोनं जरी मदत केली तरी ‘राहुल’ नावाचं सॅटेलाईट लाँच होणार नाही”

-….याप्रकरणी भाजप राधाकृष्ण विखे पाटलांची चौकशी करणार!