कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई |  शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

कर्जमाफीची दुसरी यादी 28 तारखेला जाहीर केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पहिल्या सरकारची कर्जमाफीची योजना अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व गोष्टी पूर्ण करूनच सरकार पुढे जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या योजना उघड्या डोळ्यांनी विरोधी पक्षांनी बघाव्या, असा चिमटा देखील उद्धव यांनी यावेळी भाजपला काढला.

महत्त्वाच्या बातम्या-

-एल्गारच्या NIA तपासावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

-तुमच्याही बुडाखाली किती अंधार आहे ते बघा; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर पलटवार

-कोणतीही चौकशी करा… मी घाबरत नाही- देवेंद्र फडणवीस

-त्यांच्यातच संवाद नाही… ते आमच्याशी काय संवाद साधणार??- देवेंद्र फडणवीस

-मराठा तरूणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस