‘बळीराजा नको करू आत्महत्या’ शाळेत मुलाची कविता; शेतकरी बापाची घरी आत्महत्या

अहमदनगर | प्रशांत नावाच्या विद्यार्थ्याने ‘शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे’ ही कविता मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सादर केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पाथर्डी तालुक्यात भारजवाडी येथे शाळेत मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तिसरीत शिकणाऱ्या प्रशांतने शेतकरी आत्महत्या या विषयावर आपली कविता सादर करत शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर त्याच्या शेतकरी वडिलांनीच आत्महत्या केल्याची घटना घडली.

मल्हारी बटुळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. घडलेल्या या घडनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बदलते वातावरण आणि अनिश्चित पाऊस यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून ठोस पाऊलं उचलली गेली नाहीत तर शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यसभेत पाठवून राष्ट्रवादी करणार ‘या’ बड्या नेत्याचं राजकीय पुनर्वसन

-बच्चू कडूंनी लुटला सर्वसामान्य जनतेसोबत लोकल प्रवासाचा आनंद

-विरोधक सीएएचं राजकारण करून दंगली घडवून आणतायत- अमित शहा

-अखेर केजरीवालांची मंजुरी; कन्हैया कुमारविरुद्ध देशद्रोहाचा चालणार खटला

-मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं तर…- देवेंद्र फडणवीस