“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक व्हावं, ते खोटं बोलत नाही असा एकही दिवस नाही”

श्रीनगर | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक व्हावं कारण मोदी खोटं बोलत नाही असा एकही दिवस जात नसल्याचं म्हणत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा परत घेण्याबाबत आम्हाला पंतप्रधान मोदींनी कोणतेही संकेत दिले नाहीत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा समाप्त केला. त्यानंतर दोन केंद्र शासित प्रदेश करण्यात आले. केंद्र सरकारचे हे पाऊल अनपेक्षित असल्याचं फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात जवानांना पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी जम्मू-काश्मिरमधील पर्यटकांनाही बाहेर काढण्यात आलं. इतके जवान काश्मिरमध्ये पाठवण्याची गरज काय होती?, असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मिरमधील अमरनाथ यात्राही त्यावेळी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हे सर्व विचित्रच होतं. जसं की काय आपला शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानसोबत युद्ध आहे. यासंंबंधी मी मोदींना विचारलं मात्र ते काहीच बोलले नसल्याचं फारूख अब्दुल्ला यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

गणपतीच्या पाटाखाली भारताचे संविधान ठेवल्यामुळे ट्रोल झालेल्या तरडेंनी मागितली जाहीर माफी; म्हणाले…

आर्थिक क्षेत्रात भारताचा चीनला आणखी एक झटका; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

सुशांतच्या संपत्तीचा वारस कोण? सुशांतच्या वडिलांचा मोठा निर्णयशिवसेना 2014-19 दरम्यान भाजपसोबत असती तर…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

राष्ट्रवादीवर पसरली शोककळा! ‘या’ दोन बड्या नेत्यांच एकाच दिवशी निधन