‘साहित्य संमेलनाला जाऊ नका’; ना. धो. महानोरांना ब्राम्हण महासंघाची धमकी?

उस्मानाबाद | 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. परंतु, साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ज्येष्ठ साहित्यिक ना. धो. महानोरांना ब्राम्हण महासंघाने दिल्याचा आरोप होत आहे. महानोर या संमेलनाचे उद्घाटन असून त्यांना धमकीवजा फोन आल्याची माहिती आहे.

ना. धो. महानोर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. धमकी हा शब्द माझ्या हिशोबात बसत नाही. धमकी मला दिलेली नाही, माझ्याशी फोनवरुन संपर्क साधण्यात आला. तसेच आपण साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

ब्राम्हण महासंघ पुण्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मला पत्र पाठवून सविस्तरपणे आपली मतं मांडली आहेत. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड आम्हाला मान्य नाही. तसेच त्यांचे लेखन आणि विचारसरणी आम्हाला मान्य नाही , असं पत्रात लिहिलं असल्याचं महानोर यांनी सांगितलं आहे.

दिब्रेटो यांची नियमानुसार एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच येत नसून संमेलनाला जाणार असल्याचं महानोर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, गृहखात्यानं त्यांची सुरक्षा वाढवली आहे.

महत्वाच्या बातम्या-