‘वडिलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे…’, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा!

मुंबई| हिंदी सिनेमातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंह. रकुल प्रीत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असेली पहायला मिळत असते. अशातच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अनेकदा तिच्या बिकिनी लूक मुळे ट्रोल झालेली पहायला मिळाली.

रकुलला याआधी बिकिनी वरून अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले होते मात्र तिला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. तिच्यासाठी तिच्या परिवाराचा पाठिंबा सर्वात महत्त्वाचा आहे.

एका मुलाखतीत रकुलनं या गोष्टीचा खुलासा केला की तिचे करिअर सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत तिच्या आईवडिलांनी तिच्या बोल्ड आणि बिकिनी लूक ला पाठिंबा दर्शवला आहे. याआधी अनेकदा मी बिकिनी कशी घालू हा प्रश्न तिला सतावायचा.

मात्र तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच पुढे जाण्याचा सल्ला दिला. रकुल ने स्वतः या गोष्टीचा जाहीर खुलासा केला की तिच्या आई-वडिलांसोबत बिकिनी लुक वरून चर्चा करते. चला तर जाणून घ्या रकुल प्रीत सिंह आणि काय सांगितले.

रकुल प्रीत सिंहने 2011 मध्ये पीजेंट मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत रकुल पाचव्या स्थानावर होती. या स्पर्धेवेळी तिला बिकिनी घालावी लागेल या गोष्टीची तिला भीती होती. त्यासाठी ती अजिबात तयार मात्र तिच्या आई-वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले.

मुलाखतीत रकुलने सांगितले की तिने तिच्या आईला सांगितले होते मिस इंडिया या स्पर्धेसाठी बिकनी घालावी लागते आणि मी यासाठी तयार नाही. त्यावेळी तिच्या आईने तिला सांगितले की यात कोणतीही एवढी मोठी गोष्ट नाही. तू स्वतःला या गोष्टीसाठी तयार कर.

रकुल सांगते की मुलांना त्यांच्या आई-वडिलांचा पाठिंबा अनेकदा मिळत नाही. मात्र माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. त्यांना माझ्या बिकिनी घालण्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

रकुल ने तिच्या वडिलांबद्दल सांगितले की जेव्हा ती बिकिनीच्या शॉपिंग साठी जायची तेव्हा तिचे वडील तिला स्वतः सांगायचे की बिकिनी गडद रंगाची घे. हलक्या रंगाची नको. रकुलने सांगितले की सुरूवातीपासून च तिचे आई वडील ओपन माईंडेड आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

अरे बापरे! बाळाला जन्म देईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं ती…

कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांसाठी धावून आली…

‘या’ अष्टपैलू खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…

IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला अश्रू अनावर,…

…..म्हणून मला माझा गोरा रंग आवडत नाही, कंगना रणौत…