श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त वडिल शक्ति कपूर झाले भावूक, म्हणाले…

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘आशिकी’, ‘बागी’, ‘एक विलन’, ‘हायदर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या श्रद्धांचा आज वाढदिवस आहे. श्रद्धा कपूर सध्या मालदिवमध्ये गेली असून तिकडे ती भरपूर मजा, मस्ती करताना दिसत आहे. 3 मार्चला श्रद्धाचा वाढदिवस असतो. याचच औचित्य साधत तिच्या वडिलांनी श्रद्धाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

देशभरातील चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. श्रद्धाच्या ३४ वा वाढदिवसानिमित्त तिचे वडील शक्ती कपूर यांनी खास शब्दात तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रद्धाविषयी बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, “यंदाचं सेलिब्रेशन खूप मोठं असणार आहे कारण यंदा आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र मालदिवमध्ये श्रद्धाचा वाढदिवस साजरा करणार आहोत. सगळे सोबत आहेत म्हटल्यावर मजा येईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

श्रद्धाविषयी पुढे सांगताना ते म्हणाले की, “श्रद्धा माणूस म्हणून खूप चांगली आहे. माझ्यात जे गुण नाहीत ते तिच्यात आहेत. तिला प्राणी खूप आवडतात. मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की आज ती एवढी  यशस्वी अभिनेत्री आहे पण तरीही ती माझं ऐकते, माझं मत विचारात घेते, माझ्याशी कायम अदबीनं वागते. मला माझ्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नाही. श्रद्धा माझ्यासाठी देवानं दिलेलं गिफ्ट आहे, ती जणू देवदूतच आहे. लहानपणी ती शाळेतल्या नाटकांमध्ये भाग घ्यायची, तेव्हा मला वाटायचं खरं की ही अभिनेत्री होईल की काय…पण शाळेत ती खूप हुशार होती आणि नंतर ती जेव्हा शिक्षणासाठी अमेरिकेला गेली तेव्हा मला वाटलंच नव्हतं ती अभिनय क्षेत्रात येईल. पण अचानक एक दिवस मी शूटिंगवरून घरी आलो तेव्हा तिने मला सांगितलं की तिने एक चित्रपट स्वीकारला आहे.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

श्रद्धानं तिच्या वाढदिवसादिवशी शक्ती कपूर यांच्याकडे एक खास गिफ्ट मागितलं. अभिनेते शक्ती कपूर यांना धुम्रपानाचं व्यसन आहे. हे व्यसन त्यांनी सोडावं अशी विनंती श्रद्धानं तिच्या वाढदिवसानिमित्तानं केली आहे.

शक्ति कपूर यांना हे व्यसन खूप दिवसांपासून असल्यानं ते एकदम सोडता येईल की नाही याविषयी त्यांनी शंका व्यक्त केली आहे. श्रद्धा कुटुंबीय मावशीचा मुलगा प्रियांक शर्मा याच्या लग्नाची पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी मालदीव येथे गेले आहेत. त्यावेळी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूर यांनी या खास गिफ्टचा खुलासा केलेला पहायला मिळालं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

महत्वाच्या बातम्या –

भारतीय संघातील ‘हा’ वेगवान गोलंदाज लवकरच बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री कंगना राणैतची सर्वोच्च न्यायालयात धाव, म्हणाली….

वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतेय? मग तुमच्या तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव

‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ