मुलांसोबत खेळली म्हणून बापाने केली मुलीलाअमानुष शिक्षा, मुलीची आत्महत्या

शिरुर- गल्लीतील समवयस्क मुलांसोबत खेळली म्हणून निर्दयी बापानेच पोटच्या पोरीला दोन दिवस उपाशी ठेवून सलग सात तास उभ रहाण्याची शिक्षा केली. शेवटी भुकेने व्याकुळ झालेल्या आणि दारड्या  बापाच्या त्रासाला कंटाळलेल्या बारा वर्षाच्या चिमुरडीने विहीरीत उडी टाकून जीव दिला. हा धक्कादायक प्रकार खोकरमोहा (ता. शिरुर) येथे घडली ही घटना गुरुवारी समोर आली पीडीत मुलीच्या आईनेच त्या घटनेला वाचा फोडली. अमृता ज्ञानेश्वर देशमुख असे मुलीचे नाव आहे.

22 जून रोजी वडील कामाला गेल्यावर अमृता व तिचा लहान भाऊ आणि नात्यातील इतर मुलांसोबत घरात खेळत होते. दुपारच्या वेळी तिचे आई-वडील बॅंकेतून घरी जेवायला आले. घरात अमृता इतर मुलांसोबत खेळत आहे हे बघुन तिच्या बापाचा पारा चढला तिला मारहान केली तसेच अमृताला घराच्या एका कोपऱ्यात उभ रहायला सांगितल एक दोन नव्हे तर तब्बल सात तास तिला एका जागेवर उभ केल.

रात्री पुन्हा तो दारु पिऊन आला व लोखंडी गज काढुन अमृताला मारहान करणार तो पर्यंत आईने मध्यस्ती केली त्यामुळे ज्ञानेश्वरला अमृताला मारता नाही आल. परंतू अमृताला रात्रभर उपाशीच ठेवल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मारहान केली.

सकाळी भुकेने व्याकूळ अमृताने बाप बाहेर गेल्यानंतर चहा केला. चहा बिस्कीट खात असताना बाप आला. त्याने तिला चहा घेऊ दिला नाही. तो पुन्हा बाहेर गेल्यानंतर मायलेकींनी स्वयंपाक केला. पण बापाने जेऊ दिले नाही. अखेर या दारुढ्या बापाच्या त्रासाला केटाळून अमृताने विहीरीत उडी मारुण आपल जीवन संपवल.

महत्वाच्या बातम्या-

-‘ती’ राजी झाली नाही म्हणून अंगावर राॅकेल ओतून जाळल

-आधि गळा दाबून मारल, नंतर केला अत्याचार मुंबईत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

-योगी सरकारच्या उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलिसांचा मृत्यू

-…तर माझ्याजवळ आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही- अभिनेत्री राणी चॅटर्जी