‘उशिरा का होईना शहाणपण आलं, निवडणुकीत…’; शरद पवारांचा मोदींना टोला

चंद्रपूर | देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर देशात सर्वात जास्त काळ चाललेलं शेतकरी आंदोलन म्हणून दिल्लीच्या सीमेवर गेल्या वर्षभरापासून चालू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला ओळखण्यात येतं.

2019 लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट बहूमताच्या ताकदीवर केंद्रात सत्ता स्थापन करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं वर्षभरातपूर्वी संसदेत तीन कृषी कायदे पारित केले होते.

तीन कृषी कायद्यांच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा मानस सरकारचा होता, असं भाजपने वारंवार सांगितलं आहे. पण यातील काही त्रुटीविरोधात देशभर आंदोलन झाली.

गेल्या एक वर्षभरापासून संसदेला घेराव घालण्याचं काम पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांनी केलं होतं. देशाच्या इतिहासात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी सीमेवर बसले होते, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलकांमध्ये बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात संघर्ष पहायला मिळाला होता. या संघर्षात तब्बल 700 हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. थंडी, वारा, पाऊस, ऊन याची परवा न करता शेतकरी आंदोलन करत होते.

आता सरकारने हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परिणामी सरकारच्या या निर्णयावर देशभरातील विविध राजकीय पक्ष आपापली प्रतिक्रिया देत आहेत.

आगामी काळात देशात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत किंमत चुकवावी लागेल या भीतीनं सरकारनं हे कायदे मागं घेतल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. उशिरा का होईना सरकारला जाग आली, या शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण सरकारनं ऐकलं नाही. तिन्ही कायदे मागं घ्या असं अनेकदा शेतकरी संघटनेनं सांगितलं पण मोदी सरकारनं ऐकलं नाही, असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी वाटेल ते करू शकणार नाहीत, हे आता सिद्ध झाल्याची टीका काॅंग्रेसनं केली आहे. गुरू नानक जंयतीच्या दिवशी कायदे मागं घेऊन मोदी सरकारनं पंजाबमधील शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद”

  थंडीत ऊन-पावसाचा खेळ; येत्या 3 दिवस ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस

  ‘मोदींनी आता ‘ही’ मागणीही मान्य करावी’; मोदींच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

  ‘…तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही’; राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

  “आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच”