धोनीची दादागिरी आता इतकी वाढलीय का?; त्याच्या धाकानं अंपायरनं चक्क निर्णय बदलला!

दुबई | दुबईमध्ये रंगलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात चेन्नईनं २० धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईनं यंदाच्या हंगामात तिसरा विजय मिळवला आहे.

चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकांमध्ये 8 विकेट गमावून 147 धावाच करता आल्या. हैदराबादकडून केन विलियम्सने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर जॉन बेयरस्टोने 23 धावांची खेळी केली.

प्रियम गर्ग, विजय शंकर आणि रशिद खानने दुहेरी धावा केल्या, मात्र त्यांना हैदराबादला विजयी करुन देणं त्यांना जमलं नाही. चेन्नई सुपर किंग्जकडून ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर सॅम करन, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला असला तरी शेवटच्या काही षटकांध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती, हैदराबादनं महेंद्रसिंग धोनीच्या संघाला घाम फोडला होता. यावेळी झालेल्या एका घटनेची सोशल मीडियावर आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

शार्दुल ठाकूरने टाकलेल्या एका चेंडूला अंपायर पॉल राफेल वाईड चेंडू देण्यासाठी वळलेच होते, तोच शार्दुल ठाकूरने आक्षेप घेतला. त्या पाठोपाठ धोनीनंही जोरदार भाष्य करत अंपायरवर दबाव आणला.

धोनीच्या या भूमिकेमुळे वाईड चेंडू देण्यासाठी वळलेला आणि जवळपास दोन्ही हात निम्म्यापर्यंत वर केलेल्या अंपायरने हात खाली घेतले आणि आपला निर्णय मधेच बदलला. सनराझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनंही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

हा प्रकार झाल्यानंतर सोशल मीडियातही याच्या प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल. ट्विटरवर #Dhoni आणि #Umpire ट्रेंड करत आहे. काही लोक धोनीच्या तर काही विरोधात ट्विट करत आहेत. त्यातील काही निवडक पण जबरदस्त ट्विट-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-