Fighter Online Leaked l बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या फायटर या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत (Fighter Online Leaked) आहेत. सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. फायटरमध्ये दीपिका आणि हृतिकची जोडी प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
फायटर चित्रपट हवाई हल्ल्यावर आधारित! :
फायटर चित्रपट हा हवाई हल्ल्यावर आधारित आहे. मात्र अशातच निर्मात्यांना मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. फायटर चित्रपट रिलीज होताच तो ऑनलाइन लीक झाला. चित्रपटाचे निर्माते फायटरला ऑनलाइन पायरसीपासून वाचवू (Fighter Online Leaked) शकले नाहीत. याचाच अर्थ आता पायरसी साईटवर जाऊनही लोक थिएटरमध्ये न जाता चित्रपट पाहू शकतात. मात्र, चित्रपटांची पायरसी हा गुन्हा असून ज्यांना हा चित्रपट एन्जॉय करायचा आहे ते मोठ्या पडद्यावरच पाहण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.
‘फाइटर’ चित्रपट ऑनलाईन लीक :
Fighter Online Leaked l मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट ‘फाइटर’ स्क्रीनवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच तो अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लीक झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काही वेबसाईटवर फायटरचे एचडी व्हर्जन चुकीच्या पद्धतीने अपलोड केले आहे. पायरसीसारख्या गोष्टींचा सर्वाधिक त्रास चित्रपट निर्मात्यांना होतो. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही होताना दिसत आहे.
मात्र, चित्रपट पायरसीचा बळी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतात आणि काही काळानंतर ते पायरसी वेबसाइटवर उपलब्ध होतात. त्यांना आळा घालण्यासाठी सतत काम केले जाते, परंतु तरीही काही लोक चुकीच्या पद्धती वापरून (Fighter Online Leaked) ऑनलाईन लीक करतात. मात्र आता फायटर चित्रपटाचे निर्माते त्यावर काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.
Fighter Online Leaked l ‘फायटर’ या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर या दिग्गज कलाकारांनी या सिनेमात महत्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील हृतिक-दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
News Title : Fighter Online Leaked
महत्वाच्या बातम्या :
Winter Child Care Tips l हिवाळ्यात लहान मुलांना आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील
Pune Tourist Places l या प्रजासत्ताक दिनी पुण्यातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
Manoj Jarange Live l मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा! तोडगा निघाला नाही तर…
Republic Day l प्रत्येक भारतीयाला ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यामध्ये काय फरक असतो माहीत असायलाच हवा!