“जितेंद्र आव्हाडांविरोधात अॅट्राॅसिटी दाखल करा”; सदावर्तेंची आक्रमक मागणी

नवी दिल्ली | राज्याच्या राजकारणात ओबीसी आरक्षणावरून आधीच रणकंदन पेटलं असताना आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी आरक्षणाच्या एका वक्तव्यावरून राज्यात जोरदार वाद पेटला आहे.

ओबीसी लोकांवर माझा विश्वास नाही, जेव्हा मंडल आयोग लागू होत होता तेव्हा ओबीसी लढले नाहीत तर महार लढले होते, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं होतं.

आव्हाड यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. आव्हाड यांच्या वक्तव्यानं सरकावर जोरदार टीका होत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. सदावर्ते यांनी आव्हाड यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.

आव्हाड यांनी वक्तव्य करताना महार या शब्दाच वापर केला होता. यावरूनच आव्हाड यांनी जातीवाद केल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. त्यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रारी अर्ज करण्यात आला आहे.

न्यायालयानं महार-दलित या शब्दावर बंदी घातली असताना आव्हाड यांनी तो वापरल्यानं त्यांनी गुन्हा केल्याची तक्रार राज्य सरकार, राज्यपाल, लोकायुक्त यांच्याकडं केली आहे.

जितेंद्रा आव्हाड यांनी दोन जातींमध्ये भांडण लावण्याच्या उद्देशानं हे वक्तव्य केल्याचं सादवर्ते म्हणाले आहेत. आव्हाड यांच्यावर अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असंही सदावर्तेे म्हणाले आहेत.

आव्हाड हे जातीय दंगल भडकविण्याच्या उद्देशानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. परिणामी त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 पुण्यात उद्यापासून नवे निर्बंध! अजित पवार म्हणतात, “नियम पाळा नाहीतर…”

 …अन् जितेंद्र आव्हाड भाजप आमदाराला म्हणाले, “साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी”

 पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…

पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”