नागपूर : ‘चांद्रयान 2’ अभियानाअंतर्गत विक्रम लँडरचे सॉफ्ट लॅन्डिंग फसल्यानंतरसुद्धा इस्रोच्या धाडसी प्रयत्नाचे कौतुक केले जात आहे. देशभरातील जनताच नाही तर जगभरातील प्रसार माध्यमांनी इस्रोवर स्तुतीसुमने उधळली आहेत. इतकेच काय तर ‘नासा’सारख्या जगविख्यात संस्थेनेसुद्धा इस्रोच्या पाठीवर कौतुक थाप दिली आहे. मात्र, शहरातील एका संस्थेनुसार या अभियानाच्या अपयशसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोचे संचालक के. सिवन जबाबदार आहेत. या संस्थेने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
जन लोकपाल संघर्ष समितीतर्फे ही मागणी करण्यात आली आहे. समितीतर्फे या आशयाचे एक निवेदन पोलीस विभागाला सुपूर्द करण्यात आले असून, पंतप्रधान मोदी आणि सिवन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीसुद्धा केली आहे.
चांद्रयान अभियान व्यवस्थित सुरू होते. मात्र लँडिंगच्या काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेस सेंटरला पोहोचले. सिवन यांनीसुद्धा आपल्या जबाबदारीकडे लक्ष न देता मोदींकडे लक्ष दिले. मोदी आणि सिवन या दोघांच्या बेजबाबदारपणामुळेच हे अभियान अपयशी ठरले आहे.
नागपूर पोलिसांनी शून्यची कारवाई करून येथे गुन्हा नोंदवावा आणि हे प्रकरणी बंगळुरू पोलिसांकडे सुपूर्द करावे, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. संस्थेचे सदस्य राजेश पौनिकर यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाकडे हे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या नावाने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजांची यांना हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी अॅड. अरविंद वाघमारे, ज्ञानेश्वर गोखे, रविकांत वाघ, मनोज सोनी, राजीव म्हैसबडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
ती क्लिप वेळ आल्यावर जनतेसमोर ठेवणार; राष्ट्रवादीचा विधानसभेच्या उपसभापतीवर गंभीर आरोप – https://t.co/v0cFsrn805 @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 17, 2019
काँग्रेसचा हात सोडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर?- https://t.co/oYgTzhBq65 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 17, 2019
‘या’ निर्णयामुळे आनंद महिंद्रा यांचं सोशल मीडियावर कौतुक!
– https://t.co/pY2l69WmQE @anandmahindra— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 17, 2019