‘या’ भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई | राज्याचे माजी मंत्री भाजप नेते बबनराव लोणीकर (BJP Leader Babanrao Lonikar) यांनी महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ केल्याचं प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे.

बबनराव लोणीकर यांच्या जालना आणि औरंगाबाद येथील घरातील विज जोडणीचा हा प्रकार असल्याचं सध्यातरी समोर येत आहे.

बबनराव लोणीकर यांनी विज अभियंते देविदास काळे यांना फोन करून थेट शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी अभियंत्याला धमकी देखील दिली आहे.

तुमच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन, तुमच्या मालमत्तांची माहिती आहे मला, आम्ही सर्व बघत आहोत, असं देखील लोणीकर म्हणाले आहेत.

संंबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्यानूसार आता लोणीकर प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

बबनराव लोणीकर यांच्याविरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरिल प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

माझ्यावर कारवाई का करताय, तिकडं जाऊन तुमच्या वस्तीत कारवाई करा, तिकडं लोक आकडे टाकतात, असं बोलताना लोणीकर यांनी दलित समाजाचा अपमान केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज, शरद पवारांकडे केली तक्रार?

Sharad Pawar | “शरद पवार एक भीष्म पितामह आहेत” 

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय! 

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा