मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यांनी राजकारण तापलं आहे. अशातच राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेची दिलगिरी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरून बोलताना सुप्रिया सुळे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, असं चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करताना म्हटलं होतं.
सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेवर राज्य महिल्या आयोगानं आक्रमक भूमिका घेतलेली पहायला मिळाली.
यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! राज्यात ‘इतक्या’ हजार पदांसाठी पोलीस भरती
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
टेस्ला कार भारतात आणण्याविषयी Elon Musk यांचा मोठा निर्णय, म्हणाले…
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची सुटका मात्र समीर वानखेडेंच्या अडचणींत मोठी वाढ
“उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संभाजीराजेंची व्यवस्थितरित्या कोंडी केली”