मुंबई | अंधेरी येथील एका आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबईबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले. मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढले तर मुंबईत पैसा रहाणार नाही. आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी रहाणार नाही, असे राज्यपाल म्हणाले होते.
त्यानंतर त्यांच्यावर सर्व पक्षांनी टीका केली होती. त्यांना अशी वक्तव्ये करण्याचे अधिकार कोणी दिले?, असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी विचारला होता. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती.
आता सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना राज्यपालांनी माफी मागीतली आहे. त्यांनी एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज (King Shivaji Maharaj) यांच्या आणि मराठी माणसांच्या या भूमित मला राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मी अगदी अल्पावधित मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. शुक्रवारी (दि. 29) रोजी मी राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात जे भाषण केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असे राज्यपाल म्हणाले.
मी केवळ गुजराती आणि राजस्थानी लोकांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर बोललो. मराठी माणसांनीच कष्टाने महाराष्ट्राला उभे केले. म्हणून आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत, असेही राज्यपाल म्हणाले.
मराठी माणसांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात मराठीचा झेंडा दिमाखात उभारला आहे. त्यामुळे मी मराठी माणसाला आणि त्याच्या योगदानाला कमी लेखण्याचे कुठेच प्रश्न उद्भवत नाही, असे राज्यपाल म्हणालेत.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अवमान ठरु शकत नाही. कारणे नसताना राजकीय पक्षांनी उगाच त्यावर वाद निर्माण करु नये, असेही राज्यपाल म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या –