Top news जळगाव महाराष्ट्र राजकारण

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

जळगाव | महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. बऱ्याच दिवसांपासून राजकारणात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच नाव आपल्या समोर येत आहे. अलीकडे एकनाथ खडसे भाजपमधीलच काही नेत्यांची नावं घेत त्यांच्यावर आरोप करत आहेत.

एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे खडसे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असं बोललं जात आहे. मात्र, खडसे यांनी आज दुपारी राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य केलं आहे. आज दुपारी खडसे खासगी कामानिमित्त जळगावमध्ये आले होते. यावेळी ते आपल्या निवासस्थानी असताना पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत मला काहीही बोलायचं नाही. नो कमेंट्स, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाच्या मुहूर्तावरही मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत. ते सर्व मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनीच ठरवले आहेत. म्हणजे माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सर्व मुहूर्त तुमचेच, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी माध्यमांनी राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षातील अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली जाईल, अशी माहिती मिळाली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील कृषिमंत्री हे पद सुद्धा खडसे यांना मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मौन सोडत उत्तर दिलं आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी मला काहीही माहित नाही. एकनाथ खडसे यांच्या विषयी जेवढी माहिती मला होती. ती सर्व माहिती मी माध्यमांना दिली आहे, असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तसेच राजकारणामध्ये नेत्यांच्या एकमेकांशी भेटीगाठी होत असतात. राज्यात भाजप सरकार असताना आम्हीही अनेकवेळा नेत्यांना भेटलो आहे. राजकारणात अनेकवेळा लोकप्रतिनिधींच्या नात्यानं भेटीगाठी घेतल्या जातात, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण

रोहन रॉय सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार? सीबीआयची मोठी कारवाई!

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सोडलं मौन म्हणाले…

धक्कादायक! सुशांत प्रकरणी ‘ते’ वृत्त चुकीचे; सीबीआयने दिले स्पष्टीकरण