मुंबई | सर्वांच्या मनावर राज्य करणारी साऊथ इंडियन सुप्रसिध्द अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) सध्या एका वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत असते. समंथाने 2017 साली साऊथ इंडियन अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.
मात्र, लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात वाद होऊ लागल्याने दोघांनी घटस्फोट घेतला. समांथा आणि नागाचैतन्य यांच्यात दहा वर्ष मैत्रीपुर्ण संबंध होते. त्यानंतर त्यांनी 4 वर्षापूर्वी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
अशातच आता नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुनने समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
समंथाला घटस्फोट हवा होता आणि नागाने ते मान्य केलं, असं नुकतंच एका मुलाखती दरम्यान नागार्जुन अक्किने सांगितलं आहे.
नागा कुटुंबाच्या आणि माझ्या प्रतिष्ठेबद्दल आम्ही थोडे काळजीत होतो, पण जेव्हा ही बातमी आम्हा सर्वांसमोर आली तेव्हा आम्हालाही धक्का बसला, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
नागा चैतन्यने समंथाच्या निर्णयाचा आदर केला, पण त्याला माझी खूप काळजी वाटत होती. मी काय विचार करणार आणि घरच्यांच्या प्रतिष्ठेचे काय होणार?, असं त्याला सतावत होतं, असंही नागार्जुनने सांगितलं.
दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. दोघांनी हा निर्णय का घेतला हे मला कळत नाही. लग्नाच्या चार वर्षांत दोघांनाही भांडताना आम्ही पाहिले नाही, असा खुलासा देखील नागार्जुनने केला आहे.
दोघांनी 2021 चे नवीन वर्ष देखील एकत्र साजरे केलं होतं. मला वाटतंय, यानंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाला असावा, असंही नागार्जुनने मुलाखतीत सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर
पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
BREAKING: ठाकरे सरकारला मोठा धक्का, 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द
आदित्य ठाकरे म्हणतात, “नितेश राणेंवर काय बोलायचं? आमची पातळी…”