अखेर रहस्य उलघडलं! भर कार्यक्रमात Captain Cool Dhoni ने सांगितलं ‘जर्सी नंबर 7’चं गुपित

मुंबई | भारताची माजी यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी (Captain Cool Dhoni) ओळख आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करताना तीन वेळा आयपीएल चषक जिंकून दिला आहे.

धोनीच्या जर्सीनंबरची नेहमी चर्चा होताना दिसते. धोनीने अनेकदा जर्सी नंबरवर भाष्य करणं टाळलं होतं. अशातच आता धोनीने जर्सी नंबर 7 मागील रहस्य सांगितलं आहे.

नंबर 7 हा माझ्या ह्रद्याच्या जवळचा नंबर आहे. नंबर 7 हा माझ्यासाठी लकी नंबर असल्याचं अनेकांने अंदाज लावले होते. या नंबरवर मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी देखील अनेक चर्चा झाल्या, असं धोनी म्हणाला.

मात्र, हा नंबर निवडण्यामागे साधं आणि सोपं कारण आहे. माझा जन्म 7 जुलैचा आहे. जन्मतारीख 7 आणि महिना देखील 7…, त्यामुळे हेच माझ्या जस्री नंबर 7 मागील खरं रहस्य आहे, असंही धोनीने सांगितलं.

कोणता नंबर चांगला आहे आणि कोणता नंबर चांगला नाही या सर्व गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा मी माझी जन्म तारीखच निवडली, असंही धोनी यावेळी म्हणाला.

लोकं मला वेगवेगळी कारणं विचारायचे त्यावेळी मी त्यांना वेगवेगळी उत्तरं देयचो, असा खुलासा देखील धोनीने यावेळी केला आहे. मी सांगायचो 8 मधून 1 वजा केल्यावर किती होतात, तर 7, त्यामुळे हा माझा फेवरेट, असं धोनी म्हणाला.

मी फारसा अंधश्रद्धाळू नाही, परंतू हा एक नंबर आहे जो माझ्या ह्रद्याच्या जवळ असल्याचं धोनीने सांगितलं आहे. या कार्यक्रमात धोनीने दिलखुलास गप्पा मारल्या.

इंडिया सिमेंटचा एक कार्यक्रम पार पडला. त्यावेळी धोनी व्हिडीओ काॅन्फर्नसच्या माध्यमातून उपस्थित होता. त्यावेळी धोनीने हे वक्तव्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी

 Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय

 सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा

अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल