15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली |  अर्थव्यवस्थेचा गाडा रूळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. त्या पॅकेजची सविस्तर माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन देत आहेत. यावेळी त्यांनी 15 हजारापेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

15 हजारहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 24 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. 15 हजारहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा EPFO सरकारद्वारे भरला जाणार असल्याची घोषणा सीतारमन यांनी केली आहे.

ईपीएफचे 24 टक्के योगदान आता फक्त मे नाही तर आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या घोषणेचा फायदा 72.22 लाख कर्मचाऱ्यांना होणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

लॉकडाऊन झाल्यानंतर काही दिवसातच गरीब कल्याण योजनेतंर्गत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. तसंच जनधन खात्यातंर्गत पैसे देण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या.

MSME ला 3 लाख कोटी विना हमी कर्ज मिळेल. तसंच मध्यम, लघूद्योग आणि कुटीर उद्योगांसाठी विशेष योजना त्यांनी सांगितली. या सर्वांना 3 लाख कोटींचं कर्ज दिलं जाईल. तसंच एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-म्हण…म्हणून गोपिचंद पडळकरांना विधान परिषदेचं तिकीट दिलं- चंद्रकांत पाटील

-मध्यम, कुटीर, लघु उद्योगांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

-प्रॉमिस तोडलं म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

-“नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…”

-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता?; आंबेडकरांची टीका