जाणून घ्या! उन्हाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने चरबी होऊ शकते कमी

मुंबई |  हिवाळा ऋतू संपला असून आता उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता वाढू लागल्याचं जाणवू लागलं आहे. उन्हाळा म्हटलं की बऱ्याच जणांची तोंडं लगेचं वाकडी होतात.

सध्या धका-धकीच्या जीवनशैलीत आपल्याला स्वत:ला आपण वेळ देत नाही. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्याचप्रमाणे आजकाल सगळी कामे बसून होत असतात. त्यामुळे लोकांची शारीरिक हालचार कमी होत असल्यामुळे चरबी वाढण्याचेही प्रमाण खुप वाढले आहे. 100 पैकी 99टक्के लोक जास्त वजनामुळे त्रस्त आहेत. यावरचाच उपया आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

काही काहींना फळ खायला खूप आवडतात. मात्र त्या फळामधून आपल्या शरीराला कोणते फायदे होतात. हे माहीत नसेत. तर आपण आज काही फळांच्या गुणधर्माविषयी जाणून घेणार आहोत. केवळ पौष्टिक आहारच नाहीतर वजन कमी करण्यासाठीही त्या फळांचा उपयोग होतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणेदार फळांचे सेवन केले पाहिजे. ही फळे आपल्या शरिराला हा़यड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे आपले वजन कमी होण्यासही फायदा होतो.

अननस- अननसामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असून त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर, व्हिटामिन सी आहे. त्यामुळे तुमची पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच अननसाच्या सेवनाने चयापचय वाढवण्याचे कामही करते.

आंबा-  आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. त्याचबरोबर त्यामध्ये अधिक पाण्याचे प्रमाण असते. आंबा हा आपल्या पाचन तंत्रासाठीही खूप उपयुक्त आहे.

कलिंगड-  उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक प्रमाणाचत असते. त्याचप्रमाणे अनेक पौष्टिक घटकही असतात आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. कलिंगड खाल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि तुम्हाला भूकही लागत नाही.

नारळपाणी- नारळ पाणी पिल्याने शरीरातील पचन संस्था सुरळीतरित्या काम करते. यामुळे शरिराला भरपूर प्रमाणात उर्जा मिळते. नारळ पाणी पिल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉल कमी होऊन चरबी कमी होण्यास मदत होते.

सफरचंद- सफरचंदामध्ये व्हिटामिन सी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे वजन कमी होण्यासही या फळाचा उपयोग होतो.

खरबूज- खरबूज या फळामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. तसेच या फळामध्ये जीवनसत्वे अ, सी, बी6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये…

“यूपीएचा विषय केंद्रातला, जिल्हास्तरावरील लोकांनी यावर…

पुण्यातील लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य,…

‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही पण….’…

“सोनाराने कान टोचले तर दुखत नाही, बरं झालं…