जाणून घ्या! पोटावर झोपल्यानं शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढते?

मुंबई| सध्या कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना विषाणूचा परिणाम आपल्या श्वसनावर होतो. त्यामुळे आपल्या शरिरातील आॅक्सिजन पातळी कमी होते. यासाठी अनेकजण काही उपाय करत असतात. एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. जास्तीत जास्त रुग्णांना आॅक्सिजनची गरज पडत आहे आणि अशात आता आॅक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.

अशातच सोशल मीडियावर एका व्हिडीओसुद्धा व्हायरल होतो आहे. त्यात एक व्यक्ती हाताला आॅक्सिमीटर लावून पोटावर झोपला. त्यानंतर त्याची आॅक्सिजनची पातळी वाढू लागली. पण खरंच असं होत का ? की त्याचा आॅक्सिमीटर बिघडला असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

पोटावर झोपल्याने किंवा अशा स्थितीत झोपल्याने खरंच शरीरातील आॅक्सिजनची पातळी वाढते का? जर वाढत असेल तर यामागे नेमकं काय कारण आहे? हे जाणून घेऊयात.

शरीरातील आॅक्सिजनची पातळी वाढण्याचा उपाय सांगणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक व्यक्ती आपल्या पोटावर झोपते. तिने हाताला आॅक्सिमीटर लावलं आहे. सुरुवातीला या व्यक्तीच्या आॅक्सिमीटरमध्ये आॅक्सिजनचं प्रमाण कमी दिसून येईल पण जेव्हा ही व्यक्ती पोटावर किंवा छातीवर उलटी झोपते तेव्हा या आॅक्सिमीटरमधील आकडेही वाढतात. म्हणजेच शरीरातील आॅक्सिजनची पातळी वाढते.

पोटावर रुग्णाला झोपावून आॅक्सिजनची पातळी वाढवणं हे काही नवीन नाही. हा वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेला एक प्रयोग आहे. अशा पद्धतीने रुग्णाला झोपवल्याने आॅक्सिजनचा स्तर बदलतो, असं सेंटर फॉर क्रिटिकल केअरचे वरिष्ठ संचालक डॉ. राजेश पांडे यांनी सांगितलं आहे.

ही वैज्ञानिक पद्धत डॉक्टर गेल्या दहा वर्षांपासून वापरत आहेत. कोरोनाआधी सामान्यपणे श्वास घ्यायला गंभीर त्रास होत असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत वापरण्यात आली, असं डॉ. पांडे यांनी सांगितलं आहे.

कोरोना महासाथीत सुरुवातीला असं केलं जात नव्हतं. आता कोरोना संकटात अॅक्सिजनची कमतरता असल्याने पोटावर झोपवणं ही आदर्श स्थिती बनवली आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी नियंत्रित करता येऊ शकते, असंही डॉ. पांडे म्हणाले.

दरम्यान, दोन पद्धतूनं आॅक्सिजन दिला जातो. एक तर आक्रमक व्हेंटेलेशन पद्धत आणि दुसरी म्हणजे बिगर इनवेसिव्ह व्हेंटिलेशन पद्धत जिथं मास्क लावला जातो. ज्या रुग्णांना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवलं जातं, तिथं ही पद्धत वापरली जाते. रुग्णालयात कमी स्टाफ आणि रुग्णांची जास्त संख्या यामुळे हे तसं अशक्यच आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

कौतुकास्पद! पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या कुत्र्याने…

दिशा पटानीला किस करत सलमाननं मोडला ‘नो किसिंग’चा नियम; सोशल…

स्वामींच्या कृपेनं ‘या’ 5 राशींच्या लोकांचा वाई काळ संपणार,…

बाॅलिवूडला आणखी एक मोठा धक्का! ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार…

शरीरातील ॲाक्सिजनची पातळी वाढवायची असेल तर ‘या’ 6 गोष्टी…