नवी दिल्ली| पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना काही बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत असते. या योजना सुरक्षित, चांगल्या आणि हमी परताव्यासाठी प्रसिद्ध असतात. या योजनांना केंद्र सरकारने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे योजनांमुळे लोकांचे पैसे सुद्धा सुरक्षित राहतात.
बचत योजनांमध्ये गुंतवलेल्या रकमेवर भारतीय पोस्ट आॅफिस आपल्याला 6.9 ते 8.0 टक्क्यांपर्यंत व्याज देते. चला तर जाणून घेऊ पोस्टातील कोणत्या योजनांवर किती व्याज दर मिळतो.
पोस्टातील बचत योजनांचे उद्देश काय – पोस्टातील बचत योजनांचे महत्वाचं उद्देश असतं की, लोकांमध्ये बचतीची भावना निर्माण करणे. पोस्टात बचतीच्या अनेक योजना आहेत. या योजना सर्व वर्गातील लोकांचा विचार करुन तयार केल्या आहेत. सरकारने बचत योजने अंतर्गत गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणुकदारांना उच्च व्याज दरासोबतच करामध्ये देखील सुट दिली आहे. यामध्ये प्रत्येक वयोगटाच्या लोकांना कोणती ना कोणती योजना देण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम – टाइम डिपॉजिट आणि पोस्ट ऑफिस योजनेमध्ये वेगवेगळा कार्यकाळ दिलेला असतो. जर तुम्ही 5 वर्षांसाठी डिपोजिट करता तर 6.7 टक्के व्याजदर मिळेल. या योजनेतील किमान गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपये आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
सुकन्या समृद्धि योजना – सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत गुंतवणुकीची रक्कम, मिळवलेली व्याज रक्कम आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्हीमध्ये आयकरात सूट मिळते. ही योजना खास मुलींसाठी तयार केली गेली आहे. या योजनेअंतर्गत 7.6 टक्के व्याज दर निर्धारित केला गेला आहे. या योजनेत कमीतकमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांची गुंतवणुक करता येते.
नेशनल सेविंग सर्टिफिकेट – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. या योजनेत गुंतवणुक करण्यासाठी 5 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी निर्धारित केला आहे. कलम 80 सी अंतर्गत प्राप्तिकरात सूट देखील उपलब्ध आहे. या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम 1000 आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीच्या रकमेला कोणतीही मर्यादा नाही.
पब्लिक प्रोविडेंट फंड – पब्लिक प्रोविडेंट फंड ही एक 15 वर्षांची लॉंग टर्म गुंतवणुक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीची किमान गुंतवणूक रक्कम आर्थिक वर्षात 500 रुपये आणि कमाल गुंतवणुकीची रक्कम 1.50 लाख रुपये आहे. या योजनेवर व्याजदर सध्या वार्षिक 7.10 टक्के आहे.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम – कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे बचत खाते उघडू शकते. हे बँकेत उघडलेल्या बचत खात्यासारखे आहे. ही योजना 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. या योजनेअंतर्गत 7.4 टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत जास्तीजास्त 150000 रक्कम गुंतवता येते.
किसान विकास पत्र – देशातील शेतकरी बांधवांसाठी ही योजना आहे. किसान विकास पत्रात गुंतवणूक करून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करू शकतात. या योजनेअंतर्गत 6.9 टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. 9 वर्षे 4 महिन्यांचा या योजनेचा कार्यकाळ असतो. या योजनेत कमीतकमी 1000 रुपयांपासुन ते जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट – ही योजना केवळ गुंतवणूकदारांना मासिक स्वरूपात व्याज देते. या योजनेतील किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे आणि एका या योजनेत गुंतवणुकदारास दर महिना पैसे भरावे लागतील. या योजनेअंतर्गत 6.9 टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत कमीतकमी 10 रुपयांपासुन ते जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम – या योजनेअंतर्गत 6.6 टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरिएड 5 वर्षांचा ठेवला आहे. या योजनेत कमीतकमी 1500 रुपयांपासुन ते जास्तीजास्त 4.5 लाख रुपये सिलिंग होल्डिंग तथा 900000 रुपये जॉइंट अकाउंटसाठी गुंतवता येतात. या योजनेअंतर्गत 6.6 टक्के व्याजदर निर्धारित केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार का?, अनिल देशमुख…
“तुम्हाला जर फाटकी जीन्स घालायची असेल तर…”…
“महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”
जाणून घ्या! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाले?
जाणून घ्या! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाले?